सोनई – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या, कृषी महाविद्यालय सोनई येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी, जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शनि-शिंगणापूर या गावात दाखल झाल्या असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कृषी कन्या भुमिका धुगे, प्रतिक्षा मोरे, श्रद्धा गोंदकर ,धनश्री आत्राम, साक्षी नागरे, वैष्णवी घाटगे यांचा समावेश असून त्या शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. तसेच गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती, समाजातील सामाजिक स्थिती, पीक पद्धती इ. विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक कार्यक्रम प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व किडी यांची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन, तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण, बीज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा.सुनिल बोरुडे, कार्यक्रम समन्वयक श्री अनुप दरंदले,कार्यक्रम अधिकारी प्रा. दिशा चव्हाण ,डॉ. संतोष चौगुले, प्रा. नरेंद्र दहातोंडे व इतर विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या स्वागताच्या कार्यक्रमाला शनि-शिंगणापूर गावाचे सरपंच श्रीमती पुष्पा बाळासाहेब बानकर, माजी सरपंच श्री.बाळासाहेब बानकर, जालिंदर दरंदले (सदस्य),तुकानाथ बानकर, गोपीनाथ देठे, दिलीप डिके, सयाजी शेटे, निलेश शेटे,विजय शेटे, डॉ. राजेंद्र शेटे,व सोमनाथ शेटे इ.उपस्थित होते.
शनि-शिंगणापूरमध्ये कृषिकन्यांचे स्वागत







