लोणी : संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे कृषी महाविद्यालय ,लोणी येथील कृषीदूतांचे आगमन झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी या कृषीदूतांचे स्वागत केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, लोणी येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने व संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी महाविद्यालय लोणीचे प्राचार्य अमोल खडके, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप आणि प्रा. अक्षया वाळुंज यांच्या सूचनेनुसार कृषीदूत धनंजय नरवडे, मनोज भोसले, यश मुसमाडे, गणेश धडांबे , तन्मय इदे हे ओझर बु. येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी ओझर बुद्रुक ग्रामपंचायत चे सरपंच सौ. स्वाती खेमनर उपसरपंच संदीप नागरे, ग्रामसेवक .एस. डी.कोल्हे व ग्रामस्थ भाऊसाहेब सानप,रेवजी बिडकर,पांडुरंग खेमनर,गबाजी खेमनर ,सचिन वरपे,सुनील खेमनर,संदीप खेमनर, सतीश गुळवे व इतर यांनी स्वागत केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया , गांडूळखत उत्पादन, चारा पिके, फळबागा , दुग्ध व्यवसाय, बायोगॅस इ. संदर्भात माहिती देणार आहे.
ओझर बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे आगमन







