शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संत ज्ञानेश्वर मंदीरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पंढरपूर पालखी सोहळा पत्रिकेचे अनावरण

---Advertisement---

सोनई : नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिरापासून निघणा-या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पंढरपूर पालखी सोहळ्याच्या पत्रिकेचे अनावरण पैसखांब मंदीर सभागृहात झाले. नव्याने स्थापन झालेल्या नियोजन समिती सदस्यांच्या उपस्थितीत सहभागी दिंडी चालक व वारक-यांनी पालखी सोहळ्यास शासनस्तरावर मानाची दिंडी म्हणून नोंद केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ, आरती व होणा-या किर्तन विषयी माहिती दिली. संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, कमिटी सदस्य श्रीराम महाराज झिंजुर्के, भगवान महाराज जंगले, हरिभाऊ महाराज भोगे, विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे तसेच विश्वासराव गडाख,नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानदेव माऊली शिंदे उपस्थित होते.संतसेवक संदीप खरड यांनी बैठकीत पालखी सोहळ्यास मानाचा दर्जा मिळावा याकरीता शासनस्तरावर प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विठ्ठल लंघे व आमदार मोनिका राजळे यांचे अभिनंदन करावे असा ठराव मांडला असता अध्यक्ष अभंग यांनी सर्वांचे अभिनंदन केले. झिंजुर्के महाराज यांनी अहिल्यानगर येथे पालखीचे स्वागत अविस्मरणीय व्हावे अशी सूचना केली. कमिटी सदस्य जाधव यांनी आभार मानले. आदिनाथ महाराज भोगे परिवाराकडून सर्वांना धोंडा महाप्रसाद देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment