शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांचा सत्कार

---Advertisement---

शेतकरी , कामगार यांचे ज्वलंत प्रश्न कीर्तनाच्या माध्यमातून मांडल्याने महाराजांचा सत्कार

संगमनेर : शेतकरी नेहमीच विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जात असतो त्यातच आता महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून यामुळे शेतकरी व कामगार मोठे हवालदिल झाले आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्या या व्यथा ह भ प उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) हे किर्तनरुपी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सतत मांडत असतात. म्हणून त्यांचा निळवंडी पाट पाणी कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निळवंडे पाट पाणी कृती समिती नगर व नाशिक यांच्या वतीने महाराजांना या कार्याबद्दलचे अभिनंदन पत्र देण्यात आले यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गायकवाड गुरुजी ,सदस्य विलासराव गुळवे, विजय मगर यांस असंख्य शेतकरी उपस्थित होते.
या पत्रात म्हटले आहे की, ह भ प उद्धव महाराज मंडलिक हे कीर्तन रुपी समाज प्रबोधन करीत आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकरी कामगार यांच्या व्यथा मांडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सरकारचेही ते लक्ष वेधत आहे. उद्धव महाराज यांच्या किर्तनसेवेत विज्ञाननिष्ठ व शास्त्रोक्त पद्धतीने समाजातील अंधश्रद्धा व अंधरुडींचे निर्मूलन होत आहे. संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज ,संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर या सर्व संतांचे बोल ओजस्वी वाणीतून आपल्या कीर्तनातून ते समाजापुढे मांडत असून विविध घटकांच्या व शेतकऱ्यांच्या ,तरुणांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम ते कीर्तनाच्या माध्यमातून करत आहे. याबद्दल निळवंडे लाभधारक शेतकरी, व निळवंडे पाट पाणी कृती समितीच्या वतीने महाराजांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असून त्यांचे आम्ही अभिनंदन करतो असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment