शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पाथरे बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीकन्यांचे आगमन

---Advertisement---

लोणी : राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे कृषी महाविद्यालय ,लोणी येथील कृषीकन्यांचे आगमन झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी या कृषीकन्यांचे स्वागत केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, लोणी येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुश्मिता विखे पाटील आणि कृषी संचालक डॉ उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी महाविद्यालय लोणीचे प्राचार्य डॉ.अमोल खड़के , कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप आणि प्रा. अक्षया वाळुंज यांच्या सूचनेनुसार कृषीकन्या अपेक्षा मैंद , प्रतीक्षा मुंतोड़े,वैजनता पवार,दिक्षा भोये, कांचन औटी हे पाथरे बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी ग्रामपंचायत पाथरे बु.चे प्रशासक श्री.उमेश गिताराम घोलप ,उपप्रशासक सौ.शाहीना आरिफ शेख , ग्रामपंचायत अधिकारी श्री.तुषार अनिल भालेराव ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुधाकर नाना कदम ग्रामस्थ नितिन बबन कदम , इंदुबाई बालासाहेब कदम व वसीम नसीर तांबोली इतर यांनी स्वागत केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून ह्या कृषीकन्या येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया , गांडूळखत उत्पादन, चारा पिके, दुग्ध व्यवसाय, बायोगॅस इ. संदर्भात माहिती देणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment