शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

डोंगरच्या ‘काळी मैना’ चा आवाज गल्लीबोळात घुमू लागला

---Advertisement---

सोनई :’आली रे आली डोंगरची काळी मैना आली’ अशी आरोळी देत सोनई गाव व परीसरात करवंद उर्फ ‘काळ्या मैना’ चे आगमन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तीने अधिकच भाव खाल्ला आहे. थंडपेय, कुल्फी, ऊसाचा रस व बर्फाचा गोळा विक्रेते तेजीत असले तरी काळी मैना सुध्दा तोंडाला गोडी निर्माण करीत आहे.मागील आठवडय़ात प्रथमच बाजारात तुरळक प्रमाणात आलेली काळी मैना शंभर रूपये पावशेर विकली गेली. आठ, दहा दिवस ओलांडले आणि आता भाव निम्म्याने घटला आहे. डोंगरमाथा व पर्वतरांगांच्या कुशीत असलेला हा रानमेवा तालुक्यातील आठवडे बाजारात विक्रीसाठी दिसू लागला आहे. सध्या विविध प्रकारचे आंबे व टरबूज,खरबूज रस्त्यावर दिसत असताना गावातील गल्लीबोळात मात्र काळ्या मैनाची हाक विक्रेत्यांकडून ऐकण्यास मिळत आहे. कागद किंवा पानावर करवंद देताना त्यावर टाकलेली मिठाची धार खवय्यांसाठी चवदार मेजवानी ठरत आहे. अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराची पर्वतरांग,हरिश्चंद्रगड अभयारण्य तसेच पुणे जिल्ह्य़ातील डोंगर द-यातून ठोक भावाने करवंद आणून किरकोळ भावात विक्री केली जात आहे. आठवडे बाजार व जत्रेत सुध्दा काळ्या मैनाचा आवाज घुमू लागला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment