कोल्हार : प्रवरा नदीवरील रामपूर बंधाऱ्यात शनिवारी दुपारी बुडालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह शोधण्यात अखेर रविवारी यश आले आहे. घटनास्थळापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर एका खड्यात या मुलाचा मृतदेह आढळून आला. विविध पालिकांच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आणि आपदा मित्रांनी अथक परिश्रम घेत रविवारी सकाळी ही शोधमोहीम फत्ते केली.शनिवारी (दि. १६) दुपारी 3 वाजेच्या सुमारास कोल्हार-भगवतीपूर हद्दीतील रामपूर बंधाऱ्यावर ही दुर्दैवी घटना घडली होती. श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब कोल्हार परिसरातील अंबिकानगर वसाहतीत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आले होते. शनिवारी हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत नदीकाठी कपडे धुण्यासाठी आला होता. दरम्यान, बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता, पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा व नदीतील खड्यांचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला त्याला शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने शोधण्याचा प्रयन्त केला परंतु रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली होती.रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने पुन्हा एकदा नदीपात्रात संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. पाण्याचा व प्रवाह आणि गाळ आणि नदीपात्रातील मोठं मोठे खड्डे यामुळे सुरुवातीला अडचणी येत होत्या. मात्र, बचाव पथकातील जवानांनी जीवाचे रान करून नदीपात्रात शोध घेतला. अखेर बंधाऱ्यापासून ४०० मीटर अंतरावर एका खड्यात मुलाचा मृतदेह अडकलेला सापडला. मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.या अत्यंत कठीण शोधमोहिमेमध्ये अनेक विभागांच्या जवानांनी मोलाचे योगदान दिले यामध्ये शिर्डी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे साईनंद भामरे, तेजस वाणी, शुभम साठे,राहता नगरपरिषद अग्निशमन दलाचे ऋषिकेश सदाफळ, प्रशांत डांगे, अमोल बनसोडे तसेच श्रीरामपूर पालिका अग्निशमन विभागाचे मुज्जू शेख, रोहित जाधव.राहुरी नगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन ,Ert रेस्क्यू टीम संगमनेर ,आपदा मित्र अनिल जाधव आणि रामराजे गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती साळवे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुदनरया सर्व पोलिसांनी व जवान आणि स्थानिक नागरिकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे मृतदेह शोधण्यात यश आले.या घटनेमुळे कोल्हार आणि श्रीरामपूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवरा नदीवरील रामपूर बंधाऱ्यात बुडालेल्या त्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला; पोलीस व बचाव पथकाला तब्बल 18 तासांनंतर यश







