शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पानेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान समितीकडून पाहणी

---Advertisement---

सोनई :- नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे दि.८ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअभियान योजनेत पानेगांव ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध विकासकामांची, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांची अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष पाहणी केली.बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ढाले, विस्तार अधिकारी गायकवाड यांच्या समितीने विविध कामांची तपासणी केली.यावेळी नेवासे पंचायत समितीचे अतिरिक्त गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, शेळके भाऊसाहेब उपस्थित होते. सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पानेगांव ग्रामपंचायतीने सुशासनयुक्त पंचायत, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग वमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पानेगांव येथील विकासकामांची पाहणी करताना समितीचे अधिकारी व ग्रामस्थ.श्रमदानातून लोकचळवळ निर्माण झाली.जलसमृद्ध, वृक्षारोपण आणि संवर्धन स्वच्छ व हरित गाव निर्मितीसोबतच सक्षम ग्रामपंचायत, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि नावीन्यपूर्णउपक्रम या घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून ग्रामविकासाचा मजबूत पाया उभारण्यात आला. शासकीय इमारती बरोबरच वृक्षांना रंगरंगोटी, स्वच्छ माझे अंगण, समृद्ध माझे गाव, स्त्री जन्माचे स्वागत, यांसारख्या योजना पानेगांवात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील जवळपास २२ गावांनी सहभाग नोंदवला. यात पानेगांव गाव अग्रेसर असून, १९९९ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी घेवून राज्यस्तरीय पुरस्कार मध्ये निवड झाली होती.त्याच पद्धतीने यावेळी हि ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या माध्यमातून आपल्या गावाला राज्य शासनाचे बक्षीस मिळवून देण्यासाठी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करीत आहेत. पानेगांव बरोबरच तालुक्यातील सहभाग घेतलेल्या विकासकामांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करुन गावात असणारे जवळपास दोन हजार झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन, मियावाकी झाडांचे यशस्वी संवर्धन, मंदिर जिर्णोद्धार वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अद्यावत वाचनालय, गावातील सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसंसद सुसज्ज आकर्षक मोक्षधाम गावातील स्वच्छतेबरोबरचं, डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिजिटल अंगणवाड्या, भव्यदिव्य असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पानेगांवकरांचा एकोपा, आणि लोकसहभाग,व प्रशासनाचा दूरदृष्टिकोनातून तालुका स्तरावरील व ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन राजकिय विरहित वातावरण दाखवलेली एकजूट प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी पानेगांव माजी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले/आंबेकर उपसरपंच सुरेश जंगले ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे आदीं सह येथील पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वृंद, अंगणवाडी आशासेविका ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment