शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शनि जयंती व शनैश्चरी अमावस्येनिमित्त शिंगणापूर येथे प्रशासकीय नियोजनाची बैठक संपन्न; भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज.

---Advertisement---

सोनई: शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आणि शनैश्चर अमावस्या असा दुर्मिळ योग येत असल्याने, श्री शनैश्चर देवस्थान, शिंगणापूर येथे भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे, यासाठी देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी विशेष नियोजन बैठक पार पडली.सदर बैठक देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी तहसीलदार सोनाली म्हात्रे, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि देवस्थानचे विभागप्रमुख उपस्थित होते.

नियोजनातील महत्त्वाचे मुद्दे:

• दर्शन व्यवस्था: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जयंती व अमावस्येच्या दिवशी चौथऱ्यावर जाऊन दर्शन बंद असेल. सर्व भाविकांना खालील रांगेतूनच दर्शन घ्यावे लागेल.

• वाहनतळ व्यवस्था (Parking): विविध मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत:1.शिर्डी-शिंगणापूर मार्ग: देवस्थान मालकीचे जागेत पार्किंग व्यवस्था असेल 2.घोडेगाव-शिंगणापूर मार्ग: देवस्थान ग्रामीण रुग्णालयाजवळ.3.कागोणी-शिंगणापूर मार्ग: हायस्कूल जवळ.

• वाहतूक व सुरक्षा: पार्किंग स्थळांपासून मंदिरापर्यंत भाविकांच्या प्रवासासाठी वाहनांना परवानगी देणे बाबत चर्चा करण्यात आली याबाबत पोलीस प्रशासनाकडून विशेष परवानगी दिली जाणार आहे. भाविकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन आणि देवस्थानचे सुरक्षा रक्षक विशेष दक्षता घेतील.

• अत्यावश्यक सेवा: भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य केंद्र, मदत कक्ष, स्वच्छता अभियान, अखंडित विद्युत पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोवीस तास कार्यान्वित ठेवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

प्रशासकीय यंत्रणा आणि देवस्थान व्यवस्थापन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असून, भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment