आंबी : केशव गोविंद विद्यालयाच्या आंबी भाग शाळेत चि. आदित्य सतिश सालबंदे याने ८६ :८० टक्के गुण मिळून एस.एस..सी,परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमाक कु.सिद्धी सुनिल साळुंके हिने ८६ टक्के गुण मिळून मिळवला,तृतीय क्रमांक कार्तिक धनंजय औताडे यांने ८५:२० टक्के गुण मिळून पटकावला. या भाग शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम टिकवली असून शाळेचे दहा विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहे. सालबंदे, साळुके व औतडे या भाग शाळेत बाजी मारणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना बहुमोल मार्गदर्शन करणारे, प्राचार्य,बी.वाय,काळे,पर्यवेक्षक श्रीनिवास खर्डे सर्व शिक्षक बृंद योचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरमाऊली कोळसे, सेक्रेटरी हर्षदादा तनपुरे,संचालक प्राचार्य भारत वारुळे, शालेय व्यावस्थापत कमेटीचे सर्व सदस्य शिक्षण प्रेमी ग्रामस्थ पत्रकार,यांचेसह आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आंबी भाग शाळेत आदित्य सालबंदे प्रथम







