शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

उद्योग, शिक्षण व संस्कृतीचा संगम : पायरेन्स आय.बी.एम.ए.च्या विद्यार्थ्यांचा गुजरात दौरा यशस्वी

---Advertisement---

लोणी : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून आणि प्रक्षेत्र भेटींमधून शिक्षण देण्याच्या उद्देशाने पायरेन्स, लोणी येथील आय.बी.एम.ए.च्या विद्यार्थ्यांचा गुजरात अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अनुभवांची समृद्ध जोड मिळाली असून नव्या करिअर संधींचे दालनही खुले झाले आहे.संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील आणि पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे. संस्थेचा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व कौशल्याधारित घडावा, यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत.पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशनच्या एमबीए व एमसीए विभागातील ४५ विद्यार्थ्यांनी अहमदाबाद–आनंद–एकता नगर येथे पाच दिवसीय औद्योगिक व शैक्षणिक सहलीत सहभाग घेतला. प्रा. सौरभ दिघे व प्रा. ऋतुजा कोतकर यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी दिली.या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, आधुनिक व्यवस्थापन पद्धती तसेच देशाच्या ऐतिहासिक व शैक्षणिक वारशाची ओळख करून देणे हा होता. शैक्षणिक अभ्यासासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात लक्षणीय भर पडली.अहमदाबाद येथे विद्यार्थ्यांनी आयआयएम अहमदाबादच्या आर्काइव्ह्सला भेट देऊन केस स्टडी पद्धती, शैक्षणिक परंपरा आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाविषयी माहिती घेतली. या भेटीमुळे उच्च शिक्षणासाठी नवी दिशा मिळाली.यानंतर साबरमती आश्रमाला भेट देत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा व जीवनमूल्यांचा परिचय करून घेतला. शांत वातावरणात त्यांनी प्रेरणादायी अनुभव घेतला. सायंकाळी कांकरीया तलाव येथे विरंगुळ्याचा आनंद लुटला.आनंद येथे अमूल डेअरी व चॉकलेट उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी दूध प्रक्रिया, पॅकेजिंग, गुणवत्ता नियंत्रण व सप्लाय चेन व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या अनुभवामुळे उत्पादन व्यवस्थापनाची सखोल समज विकसित झाली.एकता नगर येथे मुक्कामादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला. कुबेर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बोटिंगचा आनंद लुटला. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाची माहिती जाणून घेतली. कॅक्टस व बटरफ्लाय गार्डनच्या भेटीतून पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली.ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली. औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अनुभवांचा समतोल साधत पायरेन्स संस्थेने एक आदर्श उपक्रम राबविल्याचे अधोरेखित झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment