शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

ओमशांती केंद्रात बालसंस्कार शिबीराची सांगता

---Advertisement---

सोनई : सोनई येथील ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या ओमशांती केंद्रात उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बाल व्यक्तीमत्व विकास व संस्कार शिबीराची सांगता उत्साहात झाली. सहा दिवसीय शिबीरात नैतिकमुल्य आणि आनंदी जीवनशैली बरोबरच आरोग्य, पर्यावरण व व्यक्तीमत्व विकासाचे धडे चिमुकल्यांना देण्यात आले.

ओमशांती केंद्राच्या प्रमुख उषादिदी यांनी शिबीरात घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देऊन केंद्राच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येत असलेल्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांची माहीती दिली. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बाफणा,डाॅ. योगेश वाघ व आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांच्या हस्ते शिबीरातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. ओमशांती परिवारातील भाई व बहिणींनी विविध खेळ, गीत व संस्काराचे धडे दिले. शिवाजी बाफणा परिवाराच्या वतीने सर्वांना मिठाई तर डाॅ. वाघ यांच्या वतीने शालेय साहित्य देण्यात आले. अनिलभाई गडाख यांनी आभार मानले.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment