आमदार अमोल खताळ पा. यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मनाद प्रतिष्ठान व धांदरफळ खुर्द ग्रामस्थांचा उपक्रम
संगमनेर : धर्मनाद प्रतिष्ठान आणि धांदरफळ खुर्द ग्रामस्थ यांच्यावतीने शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ पा.यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी सुप्रसिद्ध हिंदुत्ववादी कीर्तनकार तथा शिव चरित्रकार अनिल महाराज देवळेकर यांचे ‘हिंदुत्व जागर विचार’ या विषया वर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
धर्मनाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजी. आशीष कानवडे व भागवत कानवडे यांनी दिली.
धांदरफळ खुर्द येथील बिरोबा महाराज मंदिराच्या सभागृहात पार पडणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पा. तसेच नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पा. आणि आमदार अमोल खताळ पा. उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते धांदरफळ बु. व चंदनापुरी जिल्हा परिषद गटातील भजनी मंडळांना वारकरी साहित्य किटचे वाटप केले जाणार आहे. तरी परिसरातील सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मनाद प्रतिष्ठान आणि धांदरफळ खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.







