शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपूर नगरपरिषद दिव्यांग निधी वाटप; २५ लक्ष रुपयांच्या निधीचे वितरण

---Advertisement---

दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी आपण सदैव तत्पर : आमदार हेमंत ओगले

दिव्यांग बांधवांना बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार : नगराध्यक्ष करण ससाणे

श्रीरामपूर : दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित दिव्यांग निधी वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार ओगले यांच्या हस्ते सुमारे २५ लक्ष रुपयांचा निधी ५९६ दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. दिव्यांग बांधवांना नगराध्यक्ष करण ससाणे व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी वेळेत निधीचे वितरण केल्याबद्दल आमदार ओगले यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, समाज्याच्या प्रत्येक घटकासाठी व त्यांच्या प्रश्नासाठी आपण कटिबद्ध आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये दिव्यांग बांधवांच्या उन्नती साठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी देखील दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्यात. तर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी आभार मानले.
यावेळी सभापती दिपक वमने, योगेश जाधव, नगरसेविका यास्मिन जावेद शेख, रवी खिलारी यांसासह अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्यावतीने मायाताई इंगळे ,रूपाली नागरे, साहिल आंबेकर ,ललिता ताथेड, दादाराम जाधव, राम डमाळे, नंदू कदम ,प्रकाश शिरसाट, भारत चौधरी, सलीम शेख, सचिन लोणकर, मेघा रघतवन, सविता कलापुरे, किशोर पांढरे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment