शिरसगाव : सदगुरू योगीराज गंगागिरीजी महाराज.प.पु ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज [श्रीक्षेत्र गोदाधाम सरला ]व प.पु गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज देवगड,यांच्या अधिपत्याखाली दिनांक 24 एप्रिल पासून 1 मे पर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्र व भास्करराव गलांडे पाटील विद्यालय प्रांगण उंदीरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भव्य कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात आले होते .यावेळी पहाटे काकडा ,सकाळी हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी पारायण,व्यासपीठ चालक ह भ प माऊली महाराज गुंजाळ ,सायंकाळी हरिपाठ ,व कीर्तन महोत्सवात रामायणाचार्य ह भ प अमोलजी महाराज गाढे ,वेदमूर्ती व्यंकटेश महाराज सोनवणे ,विनोदाचार्य ह भ प गंगाराम महाराज राऊत ,भागवताचार्य ह भ प भारतीताई गाडेकर ,ह भ प स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज ,विनोदाचार्य वाणीभूषण ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे ,स्वर भास्कर ह भ प बाळासाहेब महाराज रंजाळे ,यांची कीर्तने झाली. 1 मे रोजी सायंकाळी सात वाजता ह भ प महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज [सरला ]यांचे काल्याचे सुंदर भक्तिमय किर्तन झाले.व महाप्रसाद झाला.यावेळी साडेतीन ते 4000 भाविकांची उपस्थिती होती.यावेळी उंदीरगाव येथील “नाचून नाही तर वाचून “शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडणारे पवन पाऊलबुद्धे यांनी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक उभारावे असा विषय मांडला होता त्यास सर्वानी संमती दिली.तसेच कीर्तन प्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनीही हा विषय घेतला या विषयावर आपला पाठिंबा जाहीर करीत लवकरात लवकर गावात भव्य शिवस्मारक उभारावे असे गावकऱ्यांना आवाहन केले.सर्व समाजातील लोकांची साथ असल्यास परवानगीची गरज नाही.दरवर्षी या गावात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो ही आनंदाची बाबा आहे.ती परंपरा अशीच सुरु ठेवावी अशी अपेकशा महंत रामगिरी महाराज यांनी केली.अनेक मान्यवरांचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी गावातील सर्व मान्यवर सर्व परिसरातील ग्रामस्थ या कीर्तन महोत्सवात सहभागी होते.सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सुनील गुंड यांनी केले.
महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उंदीरगाव अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता







