सोनई : खुपटी (ता.नेवासा) ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेल्या गोरक्षनाथ तनपुरे यांनी नेवासे शहरात विविध देवस्थान व मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतल्यानंतर गावात त्यांची सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली. निवडणुकीत त्यांचे चिन्ह असलेल्या ‘रोड-रोलर’ वर बसून कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकात नवनिर्वाचित सरपंच तनपुरे यांच्यावर गुलालाची उधळण करीत पुष्पवृष्टी केली. गावातील ग्रामदैवत व विविध मंदिरात श्रीफळ अर्पण करण्यात आले.सुरेश कार्ले, चांगदेव वरुडे, कुंडलिक गव्हाणे एकनाथ नेव्हल, अशोक बर्डे,ज्ञानेश्वर कार्ले, भानुदास चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील विकासात्मक कामांना प्राधान्य देताना मुलभूत प्रश्न व सर्वसमावेशक नाते निर्माण केले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सरपंच तनपुरे आपल्या निवासस्थानी गेल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. आईवडिलांचा आशिर्वाद घेऊन त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार मानले.
सरपंच गोरक्षनाथ तनपुरे यांची खुपटी गावात मिरवणूक







