शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल – सौ. शालीनीताई विखे पाटील

---Advertisement---

जनसेवा फौडेशनचा उपक्रम..


लोणी : महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यावर शासनाचा भर असून, या तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्राला मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), अहिल्यानगर यांच्या जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत उद्योग व रोजगार निर्मितीसाठी विशेष योजनेच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत समाविष्ट महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जनसेवा फाउंडेशन, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी मतदारसंघाती पहिल्या टप्पातील १३ ड्रोनव्दारे महिला बचत गटांना शेती व्यवसाय किफायतशीर व्हावा तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा यासाठी ड्रोनचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, तसेच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या साहाय्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना महिला बचत गटांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. जनसेवा फाउंडेशनने सुरुवातीपासूनच या कामात पुढाकार घेतला असून आज जिल्ह्यात सुमारे ४० हजारांहून अधिक महिलांचे बचत गट संघटित झाले आहेत.
या महिलांना विविध व्यवसायांबरोबरच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येत आहे. उत्पादन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, भाजीपाला प्रक्रिया, तसेच उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेचे प्रशिक्षण दिले जाते. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर महिलांना प्रत्यक्ष विक्री करता यावी यासाठी विविध शासकीय योजनांतून आर्थिक मदतही केली जाते.
ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत वेळ व खर्चाची बचत होऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. या तंत्रज्ञानाचा महिलांनी योग्य वापर करून आपल्या शेतीत अधिक उत्पादन मिळवावे, असे आवाहनही सौ. विखे पाटील यांनी केले.
यावेळी संवत्सरचे सरपंच विवेक परजणे, माविमचे तालुका प्रमुख दीपक लुटे, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका सौ. रुपाली लोंढे, सुनील आहेर, वावगे ग्रीन कृषी विमान व ब्रिज टेक इंडस्ट्रीज प्रा. लि. अहिल्यानगरचे निलेश गागरे, अनिकेत झांबरे, भगवान म्हसे,निता कांदळकर आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment