शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

निमगाव शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप

---Advertisement---

श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा निमगाव शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माता मंदाकिनी तुळशीराम पवार होत्या.प्रास्ताविकात वर्गशिक्षिका मीना निकम यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला एक फॅन व सर्व शिक्षकांना लेखणी भेट देऊन शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळा व शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले.आता या शाळेतील सहवास संपणार यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.मुख्याध्यापक संतोष वाघमोडे,शिक्षिका प्रतिभा भिसे,सुधा गमे,मीना निकम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांना पुलाव,वडा पाव,जिलेबी असे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment