शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

देवगड परिवारातर्फे प्रयागराज व वाराणसीला गंगापूजन

---Advertisement---

सोनई : तिर्थक्षेत्र देवगड भगवान दत्तात्रेय देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत देवगड भक्तगण व पेसोडे परिवाराच्या वतीने महंत भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे अस्थिविसर्जन करण्यात आले. प्रयागराज येथील गंगा,यमुना व सरस्वती नदीचे संगमावर विधिवत पूजन करण्यात आले. वाराणसी (काशी) येथे गंगापूजन, साडी-चोळी अर्पण व महाआरती सोहळ्यात सहभाग घेऊन भक्तगणांनी आशिर्वाद घेतला.देवगड येथील प्रवरानदीच्या तीरावर सरुबाई पेसोडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर येथे सलग तेरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, ग्रंथ वाचन व किर्तन झाले. चौदाव्या दिवशी सावखेडा आश्रमाचे महंत कैलासगिरी महाराज यांचे किर्तन झाले होते. यावेळी महाराष्ट्रातून अनेक संत,महंत उपस्थित होते.चौदाव्या दिवशी विधिवत कार्य झाल्यानंतर महंत भास्करगिरी महाराज यांचे बंधू मधुकर पेसोडे व भगिनी कमलबाई रायपुरे यांच्या हस्ते प्रयागराज व काशी येथे पुरोहितांच्या हस्ते विधी करण्यात आला. स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत काशी गंगा सेवा समितीच्या घाटावर सत्संग करण्यात आला. यावेळी बाळकृष्ण महाराज कानडे, शुभम महाराज बनकर, मुरमेचे सरपंच अजय साबळे व परिवारातील संतसेवक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment