लोणी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा आयोजन पुरस्कार लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महिला गृह विज्ञान आणि संगणक महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. अशी माहीती प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे यांनी दिली.
मिरजगांव येथील एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले नूतन महाविद्यालय मिरजगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विघापीठ नाशिकचे कुलगुरु डॉ. संजिव सोनवने यांच्या हस्ते महाविद्यालयचे क्रिडा शिक्षण संचालक डॉ. उत्तम अनाप यांनी हा पुरस्कार स्विकारला.यावेळी क्रिडा समिती अध्यक्ष डॉ. तानाजी धसाळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ए.बी. चेडे विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. दिपक माने,डॉ. सुदाम शेळके, प्रा. मधुकर राळेभात, डॉ. राजेंद्र देवकाते उपस्थित होते.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विविध खेळाचेही ज्ञान दिले जाते यामुळे आज प्रवरेचा विद्यार्थी हा राज्य पातळीसह जागतिक पातळीवर पोहोचला आहे. संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण सुविधासह बरोबरच उत्कृष्ट अशी विविध खेळाची मैदानी उपलब्ध आहेत. क्रीडा शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षणही दिले जाते. विविध सेवा सुविधांमुळे राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध स्पर्धेला मैदान उपलब्ध करून देण्यात प्रवरा ही अग्रस्थानी कायमच राहिले आहे.
महाविद्यालयाच्या या यशाचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.
प्रवरेच्या महिला गृहविज्ञान आणि संगणक उत्कृष्ट शास्र महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा”उत्कृष्ट क्रीडा स्पर्धा आयोजन पुरस्कार







