आंबी : राहुरी तालुक्यातील धार्मिक गाव म्हणून लौकीक असलेल्या आंबी अंमळनेर या दोन्ही गावचे ग्राम दैवत असलेल्या श्री अंबिकेश्वराची यात्रा सालाबादप्रमाणे याहिवषी साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाच्या शुभदिनी यात्रोला प्रारंभ होऊन तिन दिवस कार्यक्रम पार पडलेआहे. प्रारंभी मंदिर परीसर सुशोभित करण्यात येऊन गावातील सर्व मंदिरावर आर्कषक विद्युत रोषनाई करण्यात आली होती. यात्रेच्या प्रारंभी सकाळी ७ वा .कावडीने आणलेल्या गंगाजलाची गावातून मिरवणुक होऊन श्री महादेवाचा महारुद्राभिषक करण्यात आला. सायंकाळी ७ ते १० फटाक्याच्या आतषबाजी करत व्रास ब्रान्ड च्या सवाद्यात छबिना मिरवणुक दोन्ही गावात काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी ४ वा ‘नामवंत मल्ल याचा कुस्त्याचा जंगी हगामा होऊन मिठाई, खेळणी,, आदि दुकाने थाटात भरगच्च अशी यात्रा भरली होती. मंगळवार दि२१ | ४ | २०२६ रोजी सायंकाळी ९ वा. स्वप्न सुंदरी ऑक्रेष्टा सिने अभिनेत्री सुवर्णा काळे यांचा सर्व समावेषक भरगच्च असा लावण्याचा कार्यक्रम प्रेक्षकांची एकच नंबर पसंती मिळून गेला.
यात्रा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी आयोजक तरुण यात्रोत्सव कमेटी, पोलीस पाटीलसह समस्त ग्रामस्थ आंबी अंमळनेर यांनी विशेष परीश्रम घेतले आहे. यात्रा शांततेत पार पडल्या बद्दल तरुण यात्रा कमेटीचे अनेकांनी कौतुक केले.
अंबिकेश्वराची यात्रा उत्साहात संपन्न







