मुंबई – अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अंध व दिव्यांगाना रेशन वाटप व काठी white cane वाटप करण्यात आले.गोरेगाव, पूर्व येथे आयोजित या कार्यक्रमात ट्रस्टच्या संस्थापक अंजली सरकाळे आणि अध्यक्षा अश्विनी बोरगांवकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास दिव्यांग आणि अंध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईत अंध आणि दिव्यांगांना मदत करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य गेली अनेकवर्षे करीत आहे. अंधांच्या बुद्धिबळ व अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजनही ट्रस्ट करीत असते.
अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अंध व दिव्यांगाना रेशन वाटप







