शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पायरेन्स आयबीएमएच्या विद्यार्थ्यांची १६ विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड एंटरप्रायझेस इंडिया प्रा. लि., मुंबई येथे निवडनोकरी उपलब्ध करण्यात लोणी पायरेन्स अव्वल स्थानावर…

---Advertisement---


लोणी : पायरेन्स संस्थेच्या लोणी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन (आय बी एम ए) या शैक्षणिक संस्थेने गुणवत्तेचा ठसा उमटवत प्लेसमेंट क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. संस्थेच्या तब्बल १६ विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड एंटरप्रायझेस इंडिया प्रा. लि., मुंबई या प्रतिष्ठित कंपनीत निवड झाली आहे.अशी माहीती संचालक मोहसिन तांबोळी यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, संस्थेच्या दर्जेदार शिक्षणाला आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला मिळालेले हे यश मानले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कंपनीत स्थान मिळवत स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. पायरेन्स आयबीएमए संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्याधारित शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, मुलाखती, गटचर्चा, सादरीकरण कौशल्य आणि समुपदेशन यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत. या प्रयत्नांचेच हे उज्ज्वल फळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे, तर आत्मविश्वास, नेतृत्वगुण, व्यावसायिक दृष्टीकोन आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे कंपनीच्या निवड प्रक्रियेत बाजी मारली.
इंटिग्रेटेड एंटरप्रायझेस इंडिया प्रा. लि., मुंबई ही व्यवसाय मार्गदर्शन विकास, वित्तीय सेवा, विक्री व्यवस्थापन आणि प्रादेशिक संचालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी कंपनी आहे. संस्थेच्या ओंकार वर्पे, भक्ती मते, वैष्णवी मोटे, पूजा पटाट, ललित सोळंकी, मनोज सोनवणे, वैष्णवी जाधव, सायली रणछोड, यामिनी वाघ, श्रद्धा नागपुरे, श्वेता शिंदे, साक्षी भांड, या विद्यार्थ्यांची रिलेशनशिप मॅनेजर सरिका थोरात, योगेश कुमावत, या विद्यार्थ्यांची डीलर पदांवर गायत्री देशमुख आणि रोहित ढोकचौळे यांची फायनान्स एक्झिक्युटिव्ह पदांवर नियुक्ती झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. अशी माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ.निलेश आवारी यांनी दिली.
पायरेन्स आयबीएमए संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक अध्यापन पद्धती, उद्योगजगताशी सुसंगत अभ्यासक्रम आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे विद्यार्थी सातत्याने विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होत असून पायरेन्स आयबीएमए हे करिअर घडविणारे विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास आले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संस्थेच्या सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील, पायरेन्सचे सचिव आणि संचालक डॉ. निलेश बनकर, पायरेन्स आय बी एम एचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment