शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

नव्या जबाबदारीची सुरुवात श्रद्धेने; सागर ढिकले यांचे ‘पैसा खांबा’ला वंदन

---Advertisement---

नेवासा : नेवासा पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देत माऊलींच्या पवित्र ‘पैसा खांबा’चे दर्शन घेतले.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आध्यात्मिक स्थळाला भेट देत दर्शन घेतल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना निरीक्षक सागर ढिकले म्हणाले की, “या मंदिराबाबत खूप काही ऐकले होते. जगाच्या पाठीवर ‘खांबा’साठी असलेले हे एकमेव मंदिर आहे. माऊलींनी पवित्र ज्ञानेश्वरी याच ठिकाणी सांगितली, माऊलींच्या कृपेने आज येथे दर्शनाचा योग आला, हे माझे भाग्य आहे.”
या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तांची उपस्थिती होती. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षकांनी घेतलेले हे दर्शन धार्मिक श्रद्धा आणि कर्तव्यनिष्ठेचा सुंदर संगम असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment