माळवाडगांव : श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील गोविंद शरद आसने या विद्यार्थ्यांने रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयात एम ए अर्थशास्त्र विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मॅनेजिंग कौन्सिल सदस्या सौ. मिनाताई जगधने व कवी संदीप जगताप यांच्या शुभहस्ते पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शेतकरी कुटुंबातील गोविंद आसने या विद्यार्थ्यांने आपल्या आई वडिलांना शेती कामात हातभार लावून एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.शेतीबरोबरच अभ्यासात सदैव मेहनत घेतल्याने त्याने एम ए अर्थशास्त्र विभागात प्रथम क्रमांक पटकावला. गोविंदची पदवीधर बहिण कु.तॄप्ती शरद आसने हीभोकर येथे पोस्ट कार्यालयात कार्यरत आहे.हा कार्यभार सांभाळत असताना कु.तॄप्ती हिने, केंद्र सरकारच्या पोस्ट विभागातील मल्टी- स्टाकींग स्टाफ ची एम टी एस ही परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली.नुकतीच तीची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ( CSMT) कार्यालयात पोस्टींग झाली आहे. अँड अजित काळे यांचे खंदे समर्थक,शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद आसने यांचे गोविंद चिरंजीव व तॄप्ती कन्या आहे.
या भावंडांचे यशाबद्दल श्रीरामपूर तालुका जिल्हा शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यासह माळवाडगांव मुठेवाडगांव भोकर खानापूर भामाठान पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
एम ए अर्थशास्त्र विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गोविंद आसने यांचा बोरावके महाविद्यालयाचे वतीने सन्मान







