शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिर समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; दिशा दर्शक कमान व फलकांची उभारणी

---Advertisement---

नेवासा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिर समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग (अहिल्या नगर) तसेच नेवासा विभागाकडे परिसरात दिशा दर्शक कमान व फलक उभारणीची मागणी सातत्याने लावून धरली होती. अखेर या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणी दिशा दर्शक कमान व माहिती फलकांची उभारणी पूर्ण केली आहे.
या कामामुळे भाविकांना मंदिराचा मार्ग सहजपणे समजणार असून, परिसरातील वाहतूक व मार्गदर्शन व्यवस्था अधिक सुकर होणार आहे. विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या माऊली भक्तांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमाबद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिर समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानण्यात आले. तसेच माऊली भक्त आणि नेवासकर नागरिकांच्या वतीनेही संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment