शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा

---Advertisement---

अहिल्यानगर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलजागृती कृती पंधरवडा २०२६ निमित्त साई एन्जेल इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली. यावेळी पाण्याचे महत्त्व, पाणी बचत व नियोजनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता जगदीश पाटील व उपकार्यकारी अभियंता उमेश कंगणकर यांनी केले.या कृती पंधरवाड्याचे औचित्य साधून शाळेत निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करून प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमास कर्मचारी गणेश लांघी, गणेश कवडे, भाग्यश्री भुसारी, श्याम पवार, राहुल जाधव तसेच मुख्याध्यापिका संध्या धुलगंडे, राजश्री दाहातोंडे, वंदना कर्डीले, स्वप्नील म्हेत्रे, इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन गणेश लांघी यांनी केले व गणेश कवडे यांनी सूत्रसंचालन केल्याने उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment