शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मिशन कर्मयोगी २०२६ मध्ये महाराष्ट्राचा डंका

---Advertisement---

६ लाखांहून अधिक एआय प्रमाणपत्रांसह देशात अव्वल

मुंबई : “राज्य प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्याच्या उद्देशाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा हा उपक्रम शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. याद्वारे प्रशासकीय कामात आधुनिकता आणि गतिमानता आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या साधना सप्ताहात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला असून मिशन कर्मयोगीमध्ये नवा मानदंड ठरला आहे.”
“याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये सहभागी टीम महाराष्ट्रातील प्रत्येक सदस्याच्या परिश्रमांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पाठवलेले अभिनंदनपत्र हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.”
“आपल्या राज्याने iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर 46,94,597 अभ्यासक्रम पूर्ण केले असून 6,59,759 एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबतच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शनासाठी फडणवीसांनी आभार मानले आहेत. तर या मिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदनही त्यांनी केले आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment