शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

‘आठवणीतले बाळासाहेब’ या व्याख्यानाने जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

---Advertisement---
  • संजय डहाळे, दिलीप ठाकूर हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी थोर समाजसुधारक आदरणीय केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुनीत स्पर्शाने आपली कारकीर्द घडविणारे जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व चे भाग्यविधाते, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हा ज्ञानयज्ञ सुरु केला. या अखंडपणे सुरु असलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेने आपल्या ४४ व्या वर्षाचा प्रारंभ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावरील व्याख्यानाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवार २४ एप्रिल २०२६ पासून जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कुमार कदम, दैनिक ‘सामना’ या शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रावर लोकमान्य टिळक विद्यपीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेले ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर हे शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावर शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी सांगून जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील.
जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक सामना मध्ये प्रारंभापासून सुमारे तीस वर्षे उच्च पदावर निष्ठापूर्वक जबाबदारी पार पाडणारे तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळविलेले दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या आधारस्तंभ सौ. पल्लवी राकेश वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व) येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment