शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील ५८ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

---Advertisement---

शिक्षणासोबत नोकरी देण्यात प्रवरा अव्वल


लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू नुकताच पार पडला. या भरती प्रक्रियेत एकूण १४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांची कंपनीने अंतिम निवड केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनी दिली.
कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांची लेखी व मौखिक परीक्षा घेण्यात आली. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना निवडीची प्रमाणपत्रे यावेळी देण्यात आली. या मुलाखतीसाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी धनंजय माने, जनमेश तारे, अभिजीत सुकाळे, श्रीकांत मिश्रा, जितेंद्र येवले आणि पोपट पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कंपनीच्या कार्यपद्धती व करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे आप्पासाहेब शेळके, डॉ. हरिभाऊ दुबे आणि डॉ. राजेंद्र गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती, औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये, प्रकल्प आधारित शिक्षण, संवाद कौशल्य आणि औद्योगिक भेटी यांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यावर महाविद्यालयाचा विशेष भर असतो.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कंपन्यांशी करार, माजी विद्यार्थ्यांचा समन्वय आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला जात असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. सुस्मिता विखे पाटील, भारत घोगरे पाटील, डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment