शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

रांजणगाव शाळेतील चार विद्यार्थ्यांची लक्ष्यवेध राज्यस्तरीय परिक्षेत यशस्वी झेप

---Advertisement---

सोनई : रांजणगावदेवी (ता.नेवासा) जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांनी लक्ष्यवेध राज्यस्तरीय परिक्षेत घवघवीत यश संपादन करून गुणवत्ता यादीत नाव कमावले आहे. ग्रामीण भागातील इयत्ता पहिलीत शिक्षण घेणा-या चार विद्यार्थ्यांमुळे गावाचे व शाळेचे नाव तालुक्यात चर्चेत आले असून पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप पडत आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर लक्ष्यवेध राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येते. शाळेतील राजवीर निलेश शिंदे, वंश पांडुरंग जावळे, सिध्दीका देविदास वाळुंजकर व अक्षरा गणेश पेहरे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षेत राजवीर शिंदे केंद्रात तृतीय तर इयत्ता दुसरीतील अंजली दत्तात्रेय जगताप हिने ‘लक्ष्यवेध’ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सर्वांना वर्गशिक्षिका रुपाली खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी डाॅ. संजय कळमकर, विस्तार अधिकारी भागीनाथ बडे, केंद्रप्रमुख रविंद्र कडू , गावचे सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
———————————

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment