शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

माऊली सेवेसाठी धान्यदान; कानडे कुटुंबाचा ५०० किलो गव्हाचा उदार हात

---Advertisement---

नेवासा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांना भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, समाजोपयोगी कार्याची परंपरा अधिक बळकट होताना दिसत आहे. गुरुवर्य वेदांताचार्य देविदास बाबा म्हस्के यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमांमध्ये विशेषतः गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण सेवा दिली जात आहे.
संस्थानमार्फत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी मंदिर प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या सेवाभावी कार्याला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने गुरुवर्य देविदास बाबा यांनी विविध गावांना धान्यदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कानडे कुटुंबाने स्वर्गीय गंगाधर पाटील कानडे यांच्या स्मरणार्थ ५०० किलो गहू माऊली मंदिरास अर्पण केले.
या उदात्त योगदानाबद्दल मंदिर समिती तसेच गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के यांनी कानडे कुटुंबाचे विशेष कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग अभंग साहेब आणि विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
यापुढेही अशाच प्रकारे समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रमांत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना दिलासा मिळत असून, समाजात सहकार्य आणि सेवाभावाची भावना दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment