शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा 100% निकालासह अभूतपूर्व यशोत्सव

---Advertisement---

इयत्ता १० वी (२०२५ – २६) मध्ये शंभर टक्के निकालासह उज्ज्वल परंपरेचा दिमाखदार वारसा कायम

संगमनेर : अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल, संगमनेर ( सीबीएसई बोर्ड, दिल्ली संलग्नित) या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेने यंदाही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता दहावी ( २०२५ – २६ ) मध्ये १००% निकाल मिळवून उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. सातत्य, गुणवत्ता आणि यश यांचा सुरेख संगम साधत शाळेने पुन्हा एकदा आपली गौरवशाली परंपरा अभिमानाने पुढे नेली असल्याची माहिती प्राचार्य सौ जे.बी. शेट्टी यांनी दिली आहे.
संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सातत्याने त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहे. उच्च निकाल व गुणवत्तेचे शैक्षणिक वातावरण हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. या वर्षी एकूण इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ८७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक तर २७ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक गुण मिळवत शैक्षणिक प्रावीण्याची उज्ज्वल छाप पाडली आहे. यामध्ये कु.शरयू विठ्ठल शेळके – ९९.६०% हिने प्रथम क्रमांक मिळवला तर कु. समरजित विश्वास वाघ – ९९% याने द्वितीय क्रमांक मिळवला तर कु. रुबल मनोहर राठोड -९८.४०% यांनी मिळवला.
विषयानुसार उत्कर्षाचे शिखर. इंग्रजी : ३ विद्यार्थ्यांनी १०० / १०० गुण मिळवले तर मराठीमध्ये. ९ विद्यार्थ्यांनी १०० / १०० गुण मिळविले विज्ञान मध्ये १ विद्यार्थ्याने १०० / १०० गुण मिळवले माहिती व तंत्रज्ञान विषयामध्ये ६ विद्यार्थ्यांनी १००/१०० गुण मिळवून आपली यशाची परंपरा कायम राखली.
या दैदिप्यमान यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांची अथक मेहनत यांचा त्रिवेणी संगम आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व मा.शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.विवेक धुमाळ, डायरेक्टर ऑफ अकॅडेमिक्स गुरव सर, प्राचार्या जे. बी. सेठी तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment