शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शिरसगाव येथे एसटी डिजिटल कार्ड सुविधा केंद्र प्रारंभ

---Advertisement---


श्रीरामपूर :
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य परिवहन बसेससाठी एनसीएमसी डिजिटल कार्ड देण्याची सुविधा प्रत्येक बस आगार येथे सुरु केली आहे. त्यासाठी तेथे कायम गर्दी होते. तालुक्यातून दुरून महिला पुरुष जेष्ठ नागरिक येत असतात. कसेतरी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक दाखवून नोंदणी केले जाते व कार्ड महिन्यांनी मिळेल असे सांगितले जाते. आता श्रीरामपूर येथील गर्दी टाळण्यासाठी एसटी विभागाकडून गावोगावी सदर सुविधा उपलब्ध केली. त्याप्रमाणे शनिवारी शिरसगाव येथे श्री बाल संन्यासी हरीबाबा महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थावतीने ही सुविधा उपलब्ध केली असून त्याचा परिसरातील जेष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला. या एसटी कार्ड सुविधा केंद्राचा शुभारंभ योगी माणिकनाथ महाराज व माजी तालुकाध्यक्ष संजय गांधी निराधार योजना गणेशराव मुदगुले व पतसंस्था चेअरमन छाया जगताप यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यावेळी व्हा चेअरमन ज्योती ताके, संचालक मनीषा मुदगुले, सचिव सुनीता बनसोडे मनीषा जाधव, समिना शेख, सलमा शेख, मयुरी गवारे, राजश्री वाघ, अर्चना यादव, अर्चना मोरे, रेणुका गवारे, अशोकराव पवार, सुभाष गवारे, लक्ष्मण यादव उपस्थित होते.
फ्रेंड्स इंटरनेट कॅफे व आपले सरकार सेवा केंद्र चालक विकास अभंग, यांना व पतसंस्थेस जेष्ठ नागरिक, महिला धन्यवाद देत आहेत. नागरिकांनी फक्त मोबाईल व आधार कार्ड सोबत आणावे असे गणेशराव मुदगुले यांनी सांगितले. मोबाईलवर संदेश आल्यावर नवीन कार्ड मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment