शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अशोक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

---Advertisement---

श्रीरामपूर : अशोकनगर येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना मानसी पाटील पुणेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे उपस्थित होते. तसेच सुरेश गलांडे, बाबासाहेब काळे, बाबासाहेब आदिक,हिम्मतराव धुमाळ, सोपानराव राऊत, विरेश गलांडे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे,अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर,काशिनाथ गोराणे, पुंजाहरी शिंदे,भाऊसाहेब उंडे,अमोल कोकणे,बाळासाहेब शिंदे, नारायण बडाख,सरपंच सविता देवकर, अशोक साखर. का.कामगार पतपेढी चेअरमन भाऊसाहेब दोंड, बाजार समिती संचालक मयुर पटारे, उमेश पवार, संतोष डहाळे, बाळासाहेब दोंड, सदाशिव उंडे, रमेश वारुळे,शाम पुरनाळे,डांगे मामा,तायडे, प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य संपत देसाई, प्राचार्य प्रसाद कोते, प्राचार्य रईस शेख, जगन्नाथ जाधव, आशिष दोंड,युवराज थोरात, सचिन राऊत, दिपक राऊत,हमीद शेख, जमील पणान,संतोष सावंत, अमोल गुडेकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी प्रसिद्ध नृत्यांगना मानसी पाटील पुणेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.त्यानंतर मानसी पुणेकर यांनी विद्यार्थ्यांसमोर आपली नृत्यकला सादर केली.
भानुदास मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप खंडागळे यांनी केले.त तसेच प्रा. सुनील म्हकांळे यांनी नियोजन केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सुयोग थोरात, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment