श्रीरामपूर : रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत रेल्वे विभागाकडून नोटिसा देण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिक व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अतिक्रमण हटवल्यास त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल, कारण त्यांच्याकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही. तसेच काही स्थानिक लोकप्रतिनिधींवर दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.
यावेळी सचिन बडदे यांनी विविध मुद्दे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले. सर्व बाबी ऐकून घेतल्यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नागरिकांना ठाम पाठिंबा देत लवकरच पुणे येथील संबंधित विभागीय कार्यालयाशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या भेटीत विकास डेंगळे, अभिजीत मोरे, मुबारक भाई, मेहबूब भाई, शुभम लोळगे, भागवत घुगे, गणेश भडांगे, युवराज घोरपडे, निलेश घोरपडे, सोमनाथ पवार, सुभाष भडांगे, योगेश वाकचौरे, वैभव शिरसाट यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
रेल्वे अतिक्रमणप्रकरणी नागरिकांनी घेतली खासदारांशी भेट







