श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील संत लोयोला चर्च येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फादर प्रकाश भालेराव अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी ॲड. मंगल दुशिंग यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिकवणी प्रमाणे आणि दिलेल्या मंत्राप्रमाणे आपले आचरण असले पाहिजे.जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी अशोक साळवे, फ्रान्सिस शेळके, आरपीआयचे प्रमुख महेंद्र त्रिभुवन, सेंट झेवियर स्कूलचे शिक्षक रवींद्र त्रिभुवन यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात रेव्ह फादर प्रकाश भालेराव यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की, शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा, ती काळाची गरज आहे ,आणि त्याच शिकवणी प्रमाणे आम्ही शिकलो पाहिजे संघटित झालो पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे असे सुंदर विचार त्यांनी मांडले.सूत्रसंचालन व आभार कमलाकर पंडित यांनी केले.
याप्रसंगी इम्यानुएल चर्चचे पास्टर अण्णासाहेब आमोलिक, भारस्कर , कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, ॲड. मंगलताई दुशिंग, प्रा. संजय दुशिंग, रवींद्र त्रिभुवन, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी अशोक साळवे, फ्रान्सिस शेळके, योसेफ कांबळे, सुरेश कांबळे, विलास बनसोडे ,जाॅन धिवर, जाॅन पंडित, शोभा त्रिभुवन, राजू त्रिभुवन, मंगल गायकवाड, संगीता पंडित, संतोष पारखे, ललित गायकवाड, प्रतिक गायकवाड व युथ ग्रुप सदस्य उपस्थित होते.
संत लोयोला चर्च येथे डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंती उत्साहात संपन्न







