शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

माजी आमदार कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

---Advertisement---

श्रीरामपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार बाबासाहेब कांबळे, नगरसेवक संतोष कांबळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष डहाळे, राहुरी तालुका प्रमुख वसंत कदम, ओबीसी सेल महिला जिल्हाप्रमुख सारिका वाव्हळ, ओबीसी सेल उप जिल्हाप्रमुख संजय बाहुले, ओबीसी सेल शहर विठ्ठल गोराणे, उपतालुका प्रमुख संदीप खाडे, माजी संचालक लाल पटेल, अर्जुन खरात, मल्लू शिंदे,विशाल दुर्गे,राजेंद्र भोसले, राजेश वाव्हळ,सुरेश बोरुडे,किरण बन्सी,सुरेश छल्ले, संदीप संघवी, प्रशांत कांबळे, सुरेश कुंकूलोळ,वैभव व्यवहारे, मेजर संतोष देवराय,बाळासाहेब सोमवंशी,गणेश कुलथे, विजय सोनवणे, खेमचंद चुग,संदीप शिंदे,निलेश क्षीरसागर,अथर्व देवराये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व शिवसेना तालुका प्रमुख संतोष डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment