शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गोधडीने केला श्रीरामपूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

---Advertisement---

श्रीरामपूर – श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात वाहून आलेली गोधडी मोटारीच्या प्लेटमध्ये अडकल्यामुळे पाईपलाईन चोकअप होऊन पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणीच भरले गेले नाही त्यामुळे आज सकाळी शहरात बऱ्याच भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही .
काल बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तलावात वाहून आलेली गोधडी मोटारी मध्ये अडकल्याने मोटर जाम झाली . त्यामुळे पाईपलाईन द्वारे पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचू शकले नाही .आज सकाळी कर्मचाऱ्यांनी मोटारीची सफाई केल्यानंतर पाणी टाक्यामध्ये भरण्यास सुरुवात झाली . त्यामुळे सकाळी शहराच्या बऱ्याच भागात पाणी आले नाही . दुपारी बारा वाजल्यानंतर काही भागांमध्ये पाणीपुरवठा झाला.
नगराध्यक्ष करण ससाने यांना सकाळी ही माहिती समजल्यावर त्यांनी थेट तलाव गाठला आणि त्या ठिकाणी पाहणी केली.एवढे त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच खराडपट्टी केल्याची समजते. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका संपूर्ण शहरवासीयांना बसला आहे.याबाबत अधिक माहिती घेतली असता कालव्यातून तलावामध्ये पाणी घेत असताना कालव्याच्या तोंडावर जाळी लावलेली नसल्याने पाटात वाहून येणाऱ्या अनेक गोष्टी तलावा थेट जातात .तलावात पाणी घेताना सुरुवातीला कालव्यातून घाण पाणी पुढे वाहून दिले जाते नंतर स्वच्छ पाणी तलावात घेतले जाते मात्र यावेळी तलावात पाणी शिल्लक नाही राहिल्याने आलेले पाणी थेट तलावात घेण्यात आले . त्यामुळे बराचसा कचरा सुद्धा तलावात जमा झाला . त्यात ही गोधडी सुद्धा होती . ही गोधडी काल रात्री नेमकी पाईपलाईन मध्ये अडकून मोटारीत अडकल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला.वास्तविक पाहता कालव्याच्या तोंडावर जिथे पाईपलाईन आहे त्या ठिकाणी मोठी जाळी बसवणे आवश्यक आहे . तसेच पाणी सुरू असताना तेथे पाणी पुरवठा विभागाचा कर्मचारी नेमणे आवश्यक आहे . मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही महिन्यापासून शहराच्या सर्वच भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment