शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अक्षय घाणे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेली निवड सामान्य जनतेसाठी प्रेरणा देणारी- रणजित श्रीगोड.

---Advertisement---

बेलापूर :- येथील श्री.सुरेश घाणे यांचे चिरंजीव अक्षय याची महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर व्यवस्थापक या पदावर निवड झाल्याबद्दल पत्रकार दीपक काळे यांचे पुढाकाराने रणजीत श्रीगोड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अक्षय घाणे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
झालेली निवड सामान्य जनतेसाठी प्रेरणा देणारी ठरल्याचे प्रतिपादन क.जे.सोमैया विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांनी केले.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले घाणे परिवार यांनी परिश्रमपूर्वक प्रगती करुन वाटचाल केली. अक्षय घाणे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेली निवड सामान्य जनतेसाठी प्रेरणा देणारी ठरणारी आहे, चि.अक्षय याचा सन्मान समाजातील सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरणारा असल्याचे त्यांनी गौरवपूर्वक सांगितले. दीपक काळे यांनी या सत्काराबरोबर त्याच्या आई वडिलांचा देखील सत्कार केला. या प्रसंगी माजी प्राध्यापक माघवराव पगारे, एकनाथ ओहोळ, सौ. रंजना घाणे, सौ. नंदिनी काळे आदी हजर होते. चि. अक्षयची २०२४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त मुख्य परीक्षेमधूनच महसूल सहाय्यक या दोन्ही पदांवरही नेमणूक झाली आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांनीही त्यांचा सत्कार केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment