शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

उंबरगावच्या कालभैरवनाथ यात्रेची हगाम्याने सांगताकणगरच्या मुलीचा सहभाग ठरला लक्षवेधी

---Advertisement---

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उंबरगाव येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ यात्रेची सांगता पारंपरिक हगामा कुस्ती स्पर्धेने झाली. या स्पर्धेत कणगर येथील एका मुलीने आखाड्यात उतरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र प्रतिस्पर्धी महिला पैलवान न मिळाल्याने तिची कुस्ती होऊ शकली नाही, मात्र तिच्या या धाडसाचे कौतुक करत यात्रा उत्सव समितीच्यावतीने तिला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.श्री कालभैरवनाथ देवस्थान यात्रा उत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात होता. पोलीस सब इन्स्पेक्टर सुधीर हापसे व पोलीस कॉन्स्टेबल श्री. तमनर यांनी कर्तव्य बजावले. यात्राकाळात ग्रामस्थ, विश्वस्त मंडळ व विविध संस्थांच्या सक्रिय गावातील पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे सामाजिक एकोपा या निमित्ताने दिसून आला. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी उंबरगाव यात्रा उत्सव समिती, ग्रामस्थ व तरुण मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment