श्रीरामपूर :भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती सोहळा बेलापूर ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून उत्साहात संपन्न झाला. बेलापूर ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांच्यावतीने डाॕ.आंबेडकर यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच छ.शिवाजी महाराज चौकात डाॕ.आंबेडकर याचा मुख्य जयंती सोहळा संपन्न झाला. गावातील विविध मंडळांकडूनही डाॕ.आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.आंबेडकरवादी तरुणाईचा याप्रसंगी उत्साह बघायला मिळाला. दिवसभर भिमगीते व डाॕ.आंबेडकर यांचा जयघोष होता. गावातील विविध मंडळांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले.या सोहळ्यात ग्रामपंचायत पदाधिकारी .विविध संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदिंची उपस्थिती होती.
बेलापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न







