शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

माजी विद्यार्थी सगम यांचेकडून निमगाव शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे भेट

---Advertisement---


श्रीरामपूर : तालुक्यातील निमगाव खैरी येथील जि.प.प्रा.शाळा निमगाव शाळेस गावाशी व शाळेशी असलेले नाते जपत शाळा व विद्यार्थी सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन मिशन आपुलकी अंतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी इंजि.संतोष सगम यांनी सतरा हजार रुपये किंमतीचे चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघाचे सदस्य ह.भ.प.दत्तात्रय सगम यांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमामुळे शाळा व विद्यार्थी सुरक्षिततेत भर पडली आहे.यावेळी गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे,केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर,सरपंच दत्तात्रय झुराळे,उपसपंच विजयसिंग परदेशी,मार्केट कमिटी माजी उपसभापती नितीन भागडे,इंजि.संतोष सगम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस,उपाध्यक्ष महेंद्र साबळे, वेणुनाथ कालंगडे,किशोर चोरडिया,मधुकर कदम,सुधीर भागडे,राजेंद्र तांबे,दिलीप भागडे,गणेश भाकरे,मेजर आप्पासाहेब काळे,बाळासाहेब भागडे,संजय त्रिभुवन,ग्रामपंचायत सदस्य संतोष बत्तीसे,भाऊसाहेब पंडित,चंद्रकांत पवार,राहुल तरस,अशोक पवार,मुख्याध्यापक संतोष वाघमोडे,शिक्षिका प्रतिभा भिसे,मिना निकम,सुधा गमे आदी उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस यांनी आभार मानले.
चौकट ( निमगाव प्राथमिक शाळेस माजी विद्यार्थी संतोष सगम यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट देऊन शाळेविषयी व्यक्त केलेला कृतज्ञता भाव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे -गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment