शिरसगाव : श्रीराम तालुक्यातील शिरसगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत शिरसगाव येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायत अधिकारी मनिषा तोडमल,मा तालुकाध्यक्ष संजय गांधी निराधार योजना गणेशराव मूदगुले,सरपंच सौ राणीताई वाघमारे , उपसरपंच संजय यादव सर्व ग्रा.प.सदस्य,तसेच मा.पोलीस पाटील सोपानराव गवारे , भास्करराव ताके ,शांताराम गवारे ,अशोकराव पवार,सुभाषराव गवारे,इसाकभाई पठाण,शांतवन गायकवाड,अशोक जाधव,अण्णा ताके,सोपान गवारे, इतेश पवार ललित गायकवाड,बंडू सुतार,सुदर्शन निकाळजे,व सर्व ग्रामस्थ आदींनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली व त्यांना आभिवादन केले. ग्रामपंचायत शिरसगावकडून 15 टक्के मागासवर्गीय खर्चातून गावठाण येथे असलेले समाजमंदिर दुरुस्त करून तेथे सुसज्ज असे डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु केले.आज डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर डॉ आंबेडकर यांचे पुतळ्याचे स्मृतिपुजन करून ग्रामस्थांना त्यांच्या चरित्राबद्दल व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल शिक्षणासाठी व सामाजिक योगदानाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी मनीषा तोडमल,भास्करराव गायकवाड, आदी मान्यवरांनी दिली.
शिरसगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वाचनालयाचा शुभारंभ







