शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

स्वामी समर्थ केंद्राच्या यज्ञमंडपात कुलदेवीचा जयजयकार

---Advertisement---

सोनई : ‘महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती,राजराजेश्वरी आईसाहेब’ असा जयघोष करीत सोनई येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातील यज्ञमंडपात स्वामी पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रत्यंगिरी चंडीयाग सोहळा उत्साहात व मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला.यावेळी उपस्थित दोनशेहून अधिक महिला सेवेक-यांनी प्रत्येक अहुतीला कुलदेवी व भारतमातेचा जयजयकार केला.
दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ मार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुचरित्र पारायण, अखंड नामजप व ज्ञानयज्ञ सोहळा सुरु आहे.ग्रामदेवता, दरबार तसेच भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीवर षोडशोपचार अभिषेक व पूजन झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण वाचन झाले. त्रिंबकेश्वर येथून आलेल्या सेवेकरी गवळी ताईंनी मार्गाची सविस्तर माहिती देऊन सध्या उभारणी सुरु असलेल्या एक हजार बेडच्या मोरे दादा रुग्णालयाची माहिती दिली.
भुपाळी आरती झाल्यानंतर यज्ञमंडपात चंडीयाग सोहळा संपन्न झाला. प्रत्येक याग होण्याच्या एक दिवस अगोदर दुपारी भागवत, स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती व मल्हारी महात्म्य ग्रंथाचे सामुहिक पारायण करण्यात आले. चोवीस तास सुरु असलेल्या प्रहरे सेवेत पंचक्रोशीतील सेवेक-यांनी सहभाग घेतला आहे. श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन करुन नामजप यज्ञ सोहळ्याची सांगता होणार आहे.
——————————-‐—-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment