शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना क.जे. सोमैया हायस्कूलचे वतीने विनम्र अभिवादन

---Advertisement---

श्रीरामपूर :-येथील हिंद सेवा मंडळ अहिल्यानगर संचलित क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.भारताला जगातील एक उत्तम संविधान देणारे, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे व समता, न्याय, बंधुता यांची शिकवण देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोर होते. असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड, जुनिअर विभागाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे, प्रशासनाधिकारी बी.एस. कांबळे, स्कूल कमिटी सदस्य किशोर फुणगे, विद्यालयाचे पर्यवेक्षक कल्याण लकडे व सर्व अध्यापक व सेवकवृंद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले.

.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment