श्रीरामपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मकॉलॉजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल श्रीरामपूरच्या फॉरेन्सिक मेडिसीन व टॉक्सीकोलॉजी विभागाच्या डॉ. रेश्मा रिजवान अहमद शेख या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहे.
त्यांचे वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक झाले असून त्यांनी एक वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मकॉलॉजी कोर्स अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेज विळद घाट येथे पूर्ण केला.
या यशाबद्दल त्यांचे डॉ. सुनील म्हस्के, डॉ. किरण वाकडे, माजी आ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा मिताली तांबे, शिवा ट्रस्ट संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, संचालक दिलीप पवार, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार, साईदीप हॉस्पिटलचे डॉ. आर. आर. धूत, डॉ. राहुल धूत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफिक मुंशी, डॉ. भूषण अनभुले डॉ. सी. बी. कुलकर्णी, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. सुहास घुले, धनंजय वाघ, डॉ. पोपट कर्डिले, डॉ. एम. के. शेख, डॉ. श्रीकांत गांधी, डॉ. सुनील पवार, डॉ. शकील सय्यद, डॉ. शरद डुबे, डॉ. अजय देशमुख, डॉ. अमोल जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. रेश्मा शेख मॉडर्न फॉर्मकॉलॉजी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण







