शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महापारेषणच्या ‘हॉट लाईन’ परिपत्रकाचे सर्वत्र स्वागत

---Advertisement---

पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ही एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते.
या महापारेषण कंपनीमार्फत राज्यामध्ये सर्व ठिकाणी दूरपर्यंत विद्युत वहनाचे काम उच्च दाबाने केले जाते.
कधी कधी सिस्टीमच्या मर्यादामुळे विद्युत वाहिनी किंवा उपकरण हे बंद केल्यास लोड शेडिंग होऊ शकते, हे टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणच्या अनेक ठिकाणी असलेले हॉटलाईन युनिट हे अति उच्च दाबाने वीज वहन चालू असताना सुद्धा विद्युत उपकरणांची दुरुस्ती देखभाल करते.
ही हॉट लाईन युनिट प्रत्येक सर्कलला एक याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महापारेषण ने मोठ्या प्रमाणात हॉटलाईन युनिट चे जाळे निर्माण केलेले आहे.
तर महापारेषण ने हॉटलाइन युनिटचा यापूर्वी असलेला 33.33% भत्ता हा वाढवून आता 40% केलेला आहे.
प्रशासकीय परिपत्रक क्र.703 नुसार आता महापारेषण कंपनीने हॉट लाईन युनिट साठी दैनंदिन कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता चालू केलेला आहे. या निर्णयाचे फील्ड वरील सर्व अभियंता व कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे.
महापारेषण प्रशासनाने पहिल्यांदाच दैनंदिन कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ते कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाचे ठरेल, असे बोलले जात आहे.
या हॉटलाइनच्या परिपत्रकाचे अनेक संघटनांनी स्वागत केले, तर काही संघटना यांनी पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली. परंतु त्यांचे समुपदेशन करण्याचे काम अप्पर जिल्हाधिकारी तथा मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालिका श्रीमती सुचिता भिकाने व मुख्य महाव्यवस्थापक श्री राजू गायकवाड यांनी अत्यंत उत्तमपणे केले.
हे परिपत्रक निर्गमित झाल्यानंतर यावर उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन त्यांनी वेळोवेळी कर्मचारी अधिकारी संघटना पदाधिकारी यांना वेळ देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या सोबत सतत सुसंवाद साधून त्याबाबत परिपत्रकाबाबतच्या सर्व शंका दूर केल्या आहे.
यापूर्वी हॉट लाईन युनिट हे प्रामुख्याने व प्राधान्याने इमर्जन्सी करेक्टिव्ह मेंटेनन्स करण्यासाठी आपला वेळ देत होते. परंतु आता दाखवलेल्या दैनंदिन कामावरच प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याने आता अनेक 400 केव्ही, 220 केव्ही, 132 केव्ही सब स्टेशन मधील बस मेंटेनन्स चालू उपकरणांची नटबोल्ट दुरुस्ती यासह अनेक प्रेव्हेंटिव्ह मेंटेनन्स वर सुद्धा भर दिला जाणार आहे.
या प्रेव्हेंटिव्ह मेंटेनन्स मुळे भविष्यात उपकरणांचे जे बिघाड होणार आहेत ते टाळले जाणार आहेत.
त्यामुळे सिस्टीमची उपलब्धता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढण्यासाठी मदतच होणार आहे.
अनेकदा 400 केव्ही,220 केव्ही व 132के व्ही या ठिकाणी असलेल्या लाईव्ह बसचा प्रेव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे सर्वच विद्युत उपकरणे व संपूर्ण तालुक्याचा वा त्या भागातील औद्योगिक, व्यापारी, कृषी क्षेत्राचा विद्युत पुरवठा बंद न करता येऊ शकल्यामुळे करता येत नव्हता.
परंतु आता हॉटलाइन युनिट हे प्रेव्हेंटिव्ह मेंटेनन्स वर सुद्धा जास्त भर देईल आणि त्याचा फायदा संपूर्ण सिस्टीमला होणार आहे.
हे परिपत्रक महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्री संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालन विभागाचे संचालक श्री सतीश चव्हाण व मानव संसाधन विभागाच्या कार्य कारी संचालिका श्रीमती सुचिता भिकाने, मुख्य महा व्यवस्थापक श्री राजु गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे निर्गमित झालेले आहे. या परिपत्रकामुळे
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, उत्पादकता आणि उद्दिष्टपूर्ती यावर आधारित कामगिरीवर प्रोत्साहन लाभ दिले जाणार आहेत.
यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी भविष्यात मोठया प्रमाणात मदत होणार असल्यामुळे फिल्ड वरील बहुतांश अधिकारी व कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment