शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

वडाळ्यातील सार्वजनिक ठिकाणी २५ बसण्याचे बाके भेट

---Advertisement---

सोनई : वडाळा बहिरोबा ता.नेवासे गावात असलेल्या सार्वजनिक ठिकाणी बसण्याची व्यवस्था व्हावी याकरीता माॅर्निग वाॅक सोशल फाऊंडेशनच्या प्रयत्नातून दानशूर व्यक्तींनी २५ बसण्याचे सिमेंटचे बाके भेट दिली आहेत. या विधायक उपक्रमाचे ग्रामस्थ व भाविकांनी स्वागत केले आहे.
फाऊंडेशनचे सदस्य सतिश मोटे यांनी ‘एक दिवस स्वच्छतेसाठी’ उपक्रमाची माहिती देताना सलग ४५ व्या रविवारी कालभैरवनाथ मंदीर परिसरात स्वच्छता केल्याचे सांगितले. राम महाराज खरवंडीकर यांच्या हस्ते देणगीदारांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देण्यात आलेले बाके महादेव मंदिर, खंडोबा मंदीर, कालभैरवनाथ मंदीर, स्मशानभूमी व दशक्रिया विधी ओट्यावर बसविण्यात आले आहेत. माॅर्निग वाॅक ग्रुपने सामाजिक बांधिलकीतून गावाबरोबरच इतर धार्मिक ठिकाणी जाऊन स्वच्छता अभियान राबविले आहे. दर रविवारी होत असलेल्या स्वच्छता कार्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment