शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गर्भावस्थेतील हृदयविकारचा झटकाभारती हॉस्पिटलमध्ये कोड मॅटर्नल अरेस्ट कार्यशाळेचे आयोजन

---Advertisement---

पुणे : गर्भावस्थेत हृदय विकाराचा झटका येणे म्हणजे दोन जीवांचा प्राण धोक्यात येणे. यावेळी जलद निर्णय आणि डॉक्टरांचे योग्य प्रशिक्षण असणे अत्यंत महत्वपूर्ण असते. मातृ सुरक्षितता अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भारती हॉस्पिटल आणि सोसायटी फॉर इमर्जन्सी मेडिसिन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कोड मॅटर्नल अरेस्ट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर अशा हृदयविकाराच्या झटक्याच्या परिस्थितीला कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले गेले.

या उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्कालीन तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, क्रिटिकल केअर विशेषज्ञ आणि भूलतज्ज्ञ सहभागी झाले होते.

अशा वेळी दोन जीव वाचवण्याचे आव्हान असते. प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. गर्भावस्थेमुळे शरीरात होणाऱ्या विशेष बदलांवर लक्ष केंद्रित केले जाते. पारंपरिक जीव वाचवण्याच्या तंत्रात बदल करून आई आणि बाळ या दोघांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होईल याची खात्री केली जाते.

आपत्कालीन विभागाच्या क्लिनिकल हेड डॉ. श्वेता त्यागी,
स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. गिरिजा वाघ यांनी ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात पुढाकार घेतला. यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, डेप्युटी डायरेक्टर डॉ. जितेंद्र ओसवाल, स्कील लॅबच्या प्रमुख डॉ. गायत्री गोडबोले, डॉ. जुई गीत हे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment